विदर्भ दखल न्यूज
प्रा मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग झिंगानूर येथील शासकिय आश्रम शाळेत अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा गडचिरोली टिम दि. २० फरवरी रात्रौ ८ वाजता पोहचून अनिस चे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगर गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर अनिसचे इंजि. विनायक रामटेके चंद्रपूर विद्यार्थामधील अंधश्रद्धा दुर झाली पाहिजे अश्या प्रकारचे मार्गदर्शन केले व विज्ञाना बाबत काही प्रात्याक्षिक दाखवून विद्यार्थांना अंधारापासून प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न अनिसच्या कार्यकर्त्यांनी केला.
सदर अनिस च्या कार्यक्रमात आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कुमरे आर एम गंटा , गोटा सौ. के एम वासनिकआदि सहीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.


Post a Comment