विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आकार देण्याची उत्तम संधी म्हणजे स्पर्श व्यासपीठ. आरमोरी येथील श्री किसनराव खोब्रागडे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम... श्री भाग्यवान खोब्रागडे संस्था अध्यक्ष यांचे प्रतिपादन..


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 



आरमोरी 
येथील श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत स्पर्श 2026 हा संस्कृतिक कला महोत्सवाचा कार्यक्रम तीन दिवस साजरा होणार असून या तीन दिवसात विद्यार्थ्यांनी आपली कला प्रदर्शित करून भविष्यात नावलौकिक करण्याची उत्तम संधी या या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी भविष्यात आपला नावलौकिक करून सांस्कृतिक वारसा जपावे असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री भाग्यवानजी खोब्रागडे यांनी स्पर्श या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केले
या उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने उद्घाटक म्हणून लाभलेले श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन भाऊ खोब्रागडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, जे व्ही दळवे, श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सुशील भाऊ खोब्रागडे , यशवंतराव चव्हाण



 महाविद्यालयाचे उपप्राचार्य ठाकरे सर, प्रमुख अतिथी प्रा तुरकर सर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर ,जॉन सर यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी ,श्री विवेक हलमारे प्राचार्य किसनराव खोब्रागडे जुनियर कॉलेज वैरागड, श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालयाचे प्रा दौलत धोटे ,आदी मान्यवर मंडळी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते
सोहळ्यानिमित्त बोलताना संस्थेचे सचिव डॉक्टर सचिनभाऊ खोब्रागडे म्हणाले की विद्यार्थ्यांना यश प्राप्त करायचे असेल तर जीवनात कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नाही निरंतर , जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करत राहणे हेच यशाचे गमक आहे न थांबता अविरत परिश्रमाने आपले जीवन उज्वल करावे अशा पद्धतीचे मार्गदर्शन डॉक्टर सचिनभाऊ खोब्रागडे यांनी केले


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नीलरत्न मंडल प्राचार्य यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी संचालन प्रा, पुनम दुर्योधन तर आभार प्रदर्शन प्रा, तेजस्विनी सहारे यांनी मानले यावेळी या कार्यक्रमाला यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल चे पालक वर्ग विद्यार्थी तसेच संस्थेअंतर्गत येणारे श्री संस्थेअंतर्गत इतर सर्व शाळेतील कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेच्या अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी वृंद प्राध्यापक वृंद कर्मचारी वृंद यांनी केले आहे स्पर्श हा कार्यक्रम दिनांक 8 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत होणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व प्राध्यापक ,कर्मचारी वृंद अविरतपणे कार्य करीत आहेत

0/Post a Comment/Comments