बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन रद्द केल्यामुळे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन..

.
विदर्भ दखल न्यूज 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - बामसेफचे ४२ वे व भारत मुक्ती चे १५ वे राष्ट्रीय अधिवेशन ओडीसा सरकारने रद्द केल्यामुळे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने देण्यात आले . या अधिवेशनाला दोन महिन्यापूर्वी परवानगी घेऊन देशा विदेशातील लाखों लोक येणार असल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून अधिवेशनाची तयारी करण्यात आली . ऐन वेळेवर परवानगी रद्द केल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले . त्यामुळे या अधिवेशनाला परत परवानगी देऊन आलेला खर्च भरून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन , २२ जानेवारीला रॅली प्रदर्शन व २२ फेब्रुवारीला नागपूरच्या आरएसएस मुख्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे .


सध्याचे सरकार संविधानाचा उदोउदो करून संविधान संपविण्याच्या षडयंत्रात आहे . अनुच्छेद १९ नुसार भाषण स्वातंत्र्य , सभा स्वातंत्र व संघटन स्वातंत्र असतांनासुद्द अधिवेशन रद्द करण्यात आले . याचा अर्थ बहुजनांचे अधिकार सरकार संपवत आहे .



निवेदन देतेवेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हासंयोजन प्रमोद राऊत, बहुजन मुक्ती पार्टीचे सचिव डोमाजी गेडाम, बुधिष्ट इंटरनेशनल नेटवर्कचे सुनंदा बांबोळकर , बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष खेमचंद इंदूरकर , राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रेमदास रामटेके , राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाच्या मंगला मेश्राम व मालता खेवले उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments