पेरमिली आर एफ ओ चे क्वार्टर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत...

विधर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 



गडचिरोली
आलापल्ली - मुख्य वनविभाग
आलापल्ली अर्तंगत पेरमिली येथील बांधलेले RFO चे क्वार्टर पुर्ण अवस्थेत तयार झालेले असून RF0 च्या राहण्याची सोय म्हणून सदर क्वार्टर उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.



शासनाने लाखो रुपये खर्च करून गावाच्या बाहेर वनविभाग जुने कार्यालय जे नक्षलवादांनी जाळले होते त्याच्या जवळच RFO च्या राहण्याची सोय म्हणून शुशोभित क्वार्टर बांधण्यात आले. वास्तविक शासनाने कार्यालय उभारण्यात प्रथम प्राध्यांन घ्यायचे होते किंवा जुन्या कार्यालयाला उजाळा घ्यायचा होता परंतु




 सर्वप्रथम राहण्यासाठी ववार्टर ची निर्मीती केली सदर जागा जंगल व्यापाने असल्यामुळे बाधलेल्या नविन क्वार्टर मधे RFo मुख्यालयी राहणार की नाही याची शंकाच वाटतो पेरमिली वनविभागाचे Rfo संध्या आलापल्ली राहुनच आपला कारभार चालवित आहेत त्यामुळे कास्तकारांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. RFO मुख्यालयी राहत नसल्यामुळे उभे जंगल चोरीच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

0/Post a Comment/Comments