तालुका महा ग्रामसभा भामरागडला गोटुल भूमीवर बैठक संपन्न...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक . मुनिश्वर बोरकर
 

गडचिरोली.
भामरागड - महाग्रामसभा भामरागड येथील गोटुल भुमीवर जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. सदरहु सभेत पेसा/ अनुसुचित क्षेत्र विस्तार कायदा 1996 व FRC/ अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क अधिनियम 2006 बाबत ग्रामसभा व प्रशासन




 ह्यांचे संयुक्त समन्वयाने सविस्तर चर्चा करण्यात आले.
आयोजित ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने आदिवासी सेवक डाॅक्टर देवाजी तोफा, जिल्हा महाग्रामसभा अध्यक्ष नितिन पदा, जिल्हा महाग्रामसभा सचिव शिवाजी नरोटे, जिल्हा महाग्रामसभा सल्लागार रविन्द्र कोवे महाराज, जिल्हा महाग्रामसभा सल्लागार अॅड . लालसु नोगोटी , जिल्हा महाग्रामसभा उपाध्यक्ष डाॅक्टर साईनाथ कोडापे, वनसिंग कोडापे, जिला महाग्रामसभा दुलसा त्तिमा, केसरी मट्टामी, आदिची उपस्थित होती.

0/Post a Comment/Comments