विदर्भ दखल न्यूज
बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी नागभीड
_ नागभीड _ राज्यातील सर्व ग्राम पंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांचा सन २०२५_२६या चालू वर्षाच्या पुर्ण रकमेसह दि १एप्रिल २०२५ पूर्वीच्या एकुण थकबाकीच्या ५० टके रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अमल बजावणी च्या कालावधीत एक रकमी ग्राम पंचायतीकडे जमा केल्यास एकूण मुळ थकबाकीच्या रकमेस ५०टकके सवलत राहील अश्या प्रकारचा ग्रामविकास व पंचायतराज विभागाचा शासन निर्णय दिनांक १३/११/२०२५चा परिपत्रक ग्रामपंचायतीला प्राप्त झाले असून सुद्धा ग्राम पंचायतचे सरपंच व सचिव यांनी कसल्याही प्रकारची विशेष ग्राम सभा न घेता या अभियानाची वाट लावली आहे शासकीय परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने विशेष ग्राम सभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजुर करणे अनिर्वाय होते सदर ग्राम पंचायतीकडे चालू वित्तीय वर्ष वगळता एकूण अंदाजे ६ते ७ लक्ष रूपये कर वसुली थकबाकी असून सुद्धा ग्राम पंचायत पहारणी च्या सरपंच, उपसरपंच व सचिव यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे जर ५० टके रक्कम वसुल झाली असती तर गावाच्या विकास कामाकरिता त्याचा वापर झाला असता या बाबत ग्राम पंचायत सदस्य श्री देवानंद बावनकर यांनी मासिक सभेत विचारना केली असता ग्राम सभा बोलावणे किंवा न बोलावणे हा आमचा अधिकार असल्याचे उत्तर सरपंच व सचिव यांनी दिले आहे असे ग्राम पंचायत सदस्य श्री देवानंद बावनकर यांनी निवेदनातून दिले आहे यावरून ग्रामपंचायत प्रशासनाचा हुकुमशाही धोरण जनतेला दिसू लागला आहे .जनतेकडून ग्रामपंचायतच्या हुकूमशाही धोरणाविरोधात रोष व्यक्त होत आहे.


Post a Comment