जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथे माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.. सोबतच आनंददायी शनिवार अंतर्गत बाल आनंद मेळावा खरी कमाई उपक्रम साजरा...


विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 





आरमोरी 
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथे 3 जानेवारी 2026 रोज शनिवारला माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली सोबतच गाईड विभागातर्फे खरी कमाई उपक्रम महोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला.
  स्त्री शिक्षणाच्या जनक माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालाअर्पण करून माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यांना अभिवादन करण्यात आले. सोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोजबी येथे


खरी कमाई हा बाल आनंद मेळाव्यातील एक महत्त्वाचा उपक्रम शाळेमध्ये साजरा करण्यात आला.यामध्ये प्राथमिक माध्यमिक वर्गातील मुलांना उद्योगशीलता, आर्थिक साक्षरता व स्वावलंबन याचे धडे मिळावेत ह्या बाबींचा विकास व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. त्यात विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर पाहुणे मंडळी तसेच पालक वर्ग यांनी मोठी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटला.


याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सौ कविताताई ताडाम सरपंच ग्रामपंचायत कोसबी, श्री गुलाब जुमनाके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,प्रमुख अतिथी म्हणून श्री.प्रलयजी चहांदे उपसरपंच कोसबी, श्री दिनेश बनकर पत्रकार कोसबी, श्री विनोदजी मानकर माजी सरपंच कोसबी श्री गुलाबजी ताडाम,श्री अविनाशजी गेडाम सदस्य ग्रा.प.कोसबी,सौ. बामणे मॅडम वैद्यकीय अधिकारी कोसबी अनिता लिंगायत उपाध्यक्ष. शाळा व्यवस्थापन समिती कोजबी आदी मान्यवर उपस्थित होते. माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती तथा बाल आनंद मेळावा खरी कमाई उपक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री चिलबुले सर, श्री शेंडे सर, श्री प्रशांत ठेंगरे सर, हेमलता आखाडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीी नमित्ताने व शालेय उपक्रमाच्या निमित्ताने गावातील नागरिक महिला भगिनी युवक वर्ग यांची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments