चातगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संपन्न...


विदर्भ दखल न्यूज 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 



गडचिरोली 
धानोरा तालुक्यातील चातगाव ग्रामपंचायत अंतर्गत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून कुणाल भोई यांनी प्रत्यक्ष ग्राम पंचायतीने लोकसहभागातून केलेल्या विविध विकास कामाची पाहणी व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.चारगाव ग्राम पंचायत अंतर्गत सर्व गावात नाली,रस्ते, शाळा, अंगणवाडी येथील उत्तम परस बागेची, बंधारा, गांडुळ खत, सौर ऊर्जा, वाचनालय इत्यादी जन विकासात्मक योजनेचे चित्रीकरण करण्यात आले.
या अभियाना अंतर्गत आपल्या भागातील जनता ही आदिवासी व अंधश्रधा मानणारी असून त्यांच्यात विज्ञानिक जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून "महाराष्ट्र राज्य जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रधा या बाबत प्रायोगिक पद्धतीने" जगदीश बद्रे जिल्हा संघटक अखिल भारतीय अंधश्रधा निर्मूलन समिती जिल्हा गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संघटनेची भूमिका समजावून सांगितली. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार या बाबत विशेष माहिती दिली. यावेळी जगदीश बद्रे यांनी अंधश्रधा म्हणजे काय व त्यात आपला समाज भोंदू मांत्रिकाकडून कसा शोषण केल्या जातो याबाबत विविध प्रयोगाद्वारे स्पष्ट करून दाखविले. अंगात येणे, हातावर कापूर जाळणे इत्यादी. महाराष्ट्र राज्य जादूटोणा विरोधी कायदा या बाबत देखील विस्तृत मार्गदर्शन केले.




या अभियानाबाबत राबवित असलेल्या विविध योजनेची माहिती गोपाल ऊईके सरपंच यानी प्रस्तावनेत संमजावुन संगीतली, मा. एस. एन. वानखेड़े गट विकास अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजना जनतेच्या कशा लाभ व फायद्याच्या आहेत याची माहिती दिली.गावातील शाळा, अंगणवाडी येते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे की त्यामुळे गावच्या विकासाचा लेखा जोखा तपासता येतो.शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रणजीत राठोड ग्राम विकास अधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे. राठोड हे आपल्या शासकीय कार्यात नेहमी तत्पर असतात.



यावेळी गोपाल ऊईके सरपंच, भूमिका धुलसे उपसरपंच, राजू ठाकरे, राहुल बावणे, गीता ऊईके, माणिकचंद कोवे हे सर्व ग्राम पंचायत सदस्य, रानीताई तोड़से पोलिस पाटिल, शिवशंकर मडावी, नाजुकराव पैदाम,सुधाकर मडावी,दामोदर सयाम, पुरुषोत्तम दुमाने पोलिस पाटिल, आरोग्य विभाग डॉ.रंगे व सर्व सहकारी, सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,गावातील बहू संख्येने महिला पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी मां.रणजीत राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.

0/Post a Comment/Comments