विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली
एका विवाहित असलेल्या महिलेवर अत्याचार करून त्या महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच तिच्या लहान बाळाला जीवे ठार मारणाऱ्या एका आरोपीला फाशीची शिक्षा व चार हजार रुपये द्रव्य दंडाचे शिक्षा ठोकण्यात आले आहे गडचिरोली जिल्हा अंतर्गत अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयाने 24 डिसेंबर रोजी हा निर्णय दिला आहे विश्वनाथ सरकार वय तीस वर्षे राहणार कांचनपूर तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली असे शिक्षा ठोठविण्यात
आलेल्या आरोपीचे नाव आहे सदर घटना 19 जून 2017 रोजी मुलचेरा तालुक्यातील कानचंपुर या गावात घडली होती आणि या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यानंतर हे प्रकरण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय यांनी केस क्रमांक 24 / 2023 मध्ये साक्ष पुरावे घेतले असता फिर्यादी व पिढीतेचा साक्षीदार तसेच वैद्यकीय पुरावा पक्षाच्या
युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी आरोपी असलेल्या संजू विश्वनाथ सरकार राहणार कांचनपूर याला भारतीय कलम 302 अन्वये फाशीची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच कलम 31 भादवी मध्ये जन्मठेप 1000 रुपये दंडाचे शिक्षा व कलम 376 भादवी मध्ये जन्मठेप 1000 रुपये दंडाची शिक्षा कलम 450 भादवी मध्ये दहा वर्षे सक्षम करावास व 1000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली व विधी सेवा प्राधिकरण यांनी पिढीतेला आर्थिक मदत देण्याचे आदेश केले आहे.



Post a Comment