तेलंगणामध्ये रोवण्यासाठी गेलेल्या महिलेचा अपघाता दरम्यान झाला मृत्यू परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर.. काही महिला झाल्या गंभीर जखमी....

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली



गडचिरोली - मुल तालुक्यातील चांदली बुजरूक येथील २० - २५ नागरिक रोवणा करण्याकरीता तेलंगणा जात असंताना पिकपला हायवाने धडक दिल्यामुळे एक




 महिला जागीच ठार झाली तर अनेक गंभीर जखमी आहेत त्यांना तेलंगणा येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले आहे.
चांदली बुजरूक येथील २५ नागरिक दि. २१ चे रात्रौ तेलगंणा रोवणा करण्याकरीता जात असतांना तेलंगणा सिमा जवळ लघुशंकेसाठी पिकप थांबली असता मागुन येणारा हायवाने धडक दिल्यामुळे यातील मिनाबाई



 अनिल लाटेलवार रा. चांदली बुज 50वर्ष हिचा जागीच मृत्यु झाला तर विकास टेकाम वय 37 यांच्या पायाला दुखापत झाली तर इतर नागरिक जखमी अवस्थेत असुन तेलगंणा पोलीसांनी तेलगंणा दवाखाण्यात भरती केले अजुन दोन महिलाची प्रकृती गंभीर असुन ते निलाताई मंडरे दिघोरी , विमलताई सोयाम बेंबाळ रहवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments