दुर्गापूर येथील माती उत्खनन कंपनीत स्थानिकांना प्राधान्य द्या.. अन्यथा आंदोलन छेडू ..रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रपूर च्या वतीने निवेदनातून कंपनीला दिला इशारा...

विदर्भ दखल न्यूज
चंद्रपूर ब्युरो



दुर्गापूर येथील कंपनीला माती उत्खलनाचे काम प्राप्त झाले आहे.हे खूप आनंदाची बाब आहे.कारण स्थानिकांना रोजगार मिळणार.परंतु कंपनीने काम चालू करून दोन महिन्यांहून अधिक कालावधी झालेला आहे.तरीपण कंपनीने स्थानिक कामगार घेण्यास टाळाटाळ करून,परप्रांतीय कामगारांना सामावुन घेतल्या जात आहे.ही स्थानिक कामगारांच्या रोजगाराची थट्टा आहे.
इथे प्रदूषण स्थानिक परिवार सहन करत आहे. जमीन जुमला, सोई सुविधा स्थानिक लोकांचा आणि रोजगारापासून स्थानिकांना जर डावलत असाल तर स्थानिकांनी जगावे तर जगावे कशाच्या आधारावर? स्थानिकांची उपासमार आणि रोजगार पूर्ण परप्रांतियांना हे कसे काय खपऊन घेतल्या जाणार?
करीता स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे ही नम्र विनंती. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गप्प बसणार नाही. जीवनमानाशी निगडित असलेल्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करू. असा इशारा कंपनीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रपूर च्या वतीने देण्यात आला आहे


आपल्या उपयुक्त सहकार्याच्या अपेक्षेसहित
सस्नेह धन्यवाद..!

प्रतिलिपी :
१) मा. नाम. पालकमंत्री, चंद्रपूर
पालकमंत्री कार्यालय चंद्रपूर
२) मा. खासदार साहिबा,
चंद्रपूर
३) जिल्हाधिकारी साहेब,
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर
४) मा. पोलिस अधीक्षक,
पोलिस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर
५) मा. क्षेत्रीय व्यवस्थापक
वे. को. ली. कार्यालय, दुर्गापूर चंद्रपूर
६) मा. डॉ राजेंद्र गवई
राष्ट्रीय सरचिटणीस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
६) मा. जिल्हा अध्यक्ष,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
जिल्हा चंद्रपूर

आपला,

अशोककुमार उमरे,
महाराष्ट्र प्रदेश चिटणीस,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

0/Post a Comment/Comments