जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान संपन्न...


विदर्भ दखल न्यूज 
पी. के. सातार 
शहर प्रतिनिधी चामोर्शी 


दिनांक 30/09/2025 रोजी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी अभियानाच्या संदर्भात ग्रामपंचायत येल्ला तर्फे मरपल्ली गावात शिवार फेरी घेण्यात आली. आदि कर्मयोगी अभियान हे भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने सुरू केलेले एक राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश आदिवासी समुदायांमध्ये विकेंद्रित नेतृत्व तयार करणे आणि त्यांना सक्षम करणे आहे. या अभियानाद्वारे आदिवासींना क्षमता विकास प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना गावपातळीवर प्रभावी नेतृत्व करता येते आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवता येतो. 'आदि कर्मयोगी पोर्टल' हे या अभियानाचे डिजिटल माध्यम आहे, जे नोंदणी, प्रशिक्षण, आणि देखरेखीसाठी वापरले जाते. सदर शिवार फेरीत गावातील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्यविभाग, महिला बचत गट,, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, शिक्षक, तलाठी, तसेच इतर गावकरी उपस्थित होते व ग्रामविकास कृती आराखडा तयार करण्यात आला.
तसेच संदर्भीय विषयांन्वये गावाच्या विकासाच्या मुद्द्याबाबत चर्चा करण्यात आली. व गाव विकासाबाबत आराखडा तयार करण्यात आला. सदर शिवार फेरीकरीता


सौ.ललिता कोडापे (सरपंच)
श्री.दिवाकर उराडे (उपसरपंच)
श्री.पी. एस. कोळेकर (कनिष्ट अभियंता पा.पु)
सौ.रुचाताई मडावी (ग्रा.पं.सदस्या)
श्री.बालाजी सिडाम (पे.अ.)
श्री.सत्यवान सिडाम (मा.ग्रा.पं.सदस्य)
सौ.अर्चना सिडाम (पो.पाटील)
कु.जोशीला निमसरकार (वनरक्षक)
श्री.एल.एस.परचाके (स.कृ.अ.)
श्री.डॉ.एस.शेख (CHO नागुलवाही)
श्री.पि.ए.गेडाम (ग्रा.पं.अधिकारी) यांची उपस्थिती होती.


0/Post a Comment/Comments