बनावट सोन्याने लाखो रुपयाची फसवणूक...


विदर्भ दखल न्यूज
भिवंडी ब्युरो



भिवंडी ;
भिवंडी मधील एका पुरुष आणि महिलेने सोन्या तारण ठेवण्याच्या नावाखाली सोने 22 कॅरेट असल्याचे भासवून एका इसमाची 28 लाख रुपयांची फसवणूक केली आहे एका क्रेडिट संस्थेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .भिवंडी काल्हेर परिसरात ही धकादायक घटना घडली आहे. एका पुरुषाने महिलेने सोने तारण ठेवण्याच्या नावाखाली एका पतसंस्थेला 2.8 लक्ष रुपयाची फसवणूक करण्याचा कट्ट रचला आणि कमी कॅरेटचे सोने गहाण ठेवले आणि 22 कॅरेट हॉलमार्क केलेले असल्याचे सांगून हे प्रकरण आधार नागरि सहकारी क्रेडिट सोसायटीचे आहे असे सांगितले रहिवासी रितू संदीप सिंग 28 आणि पूर्णा येथील रहिवासी राजन रामलोचन शुक्ला व 32 यांनी संपर्क साधून संस्थेसोबत विश्वासघात केला आणि तब्बल 134 पॉईंट तीन ग्रॅम वजनाच्या बांगड्या आणि एक साखळी जमा केली सोने 22 कॅरेटचे नव्हते फक्त एक ते सहा कॅरेटचे सोने होते. जेव्हा सोसायटीची संस्थेची त्यांनी सखोल चौकशी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि सर्व सोने बनावट हॉलमार्कचे संस्थेला पोहोचवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र ही फसवणूक कुठे कुठे झाली आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत . याची चौकशी पोलीस प्रशासन दोन्ही आरोपीकडून करून घेत आहे .

0/Post a Comment/Comments