विदर्भ दखल न्यूज
बाळकृष्ण उंबरकर तालुका प्रतिनिधी
नागभिड
नागभीड तालुक्यामधील तलाठी साजा क्रमांक ७ मौशी येथील तलाठी याची बदली झाली असल्यामुळे सदर साज्यावर नवेगाव पांडव साज्यामधिल तलाठी श्री डी व्ही मगर याचेकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे मौशी साज्यामध्ये मौजा मौशी, बालापुर खुर्द, चक मौशी, ढोरपा, इरव्हा टेकरी ही सहा गावे येतात सदर गावामधील शेतकरी बांधवाना तलाठी याचेसोबत काम पडतो तेव्हा शेतकरी बांधव तलाठी यास आपण येत आहात का म्हणुन फोन करतो तर हा मग्रुर तलाठी फोन उचलत नाही त्यामुळे तलाठी येत असेल म्हणून शेतकरी बांधव हा मौशी येथील तलाठी कार्यालयात जाऊन दिवस भर तलाठी याची वाट पाहत बसुन राहतो पण हा मग्रूर तलाठी कार्यालयात येत नाही त्यामुळे शेतकरी सायंकाळी आल्या पावली घरी वापस जातो जर एखाद्या दिवशी तलाठी मौशी कार्यालयात आलास तर दुपारी १ते २ववाजता येतो त्या मुळे शेतकरी बांधवांचे काम वेळेवर होत नाही तसेच ७/१२ व आठ अ,नकाशा यांचे प्रत्येकी १५ रुपये घ्यायला पाहिजे परंतु तलाठी ३० रुपये घेत आहे ही शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक आहे करीता हा शेतकऱ्यांना होणारा त्रास व लुबाडणूक वरीष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी लक्षात घेऊन लवकरात लवकर मौशी साज्याला स्थाईक देण्यात यावा आणि शेतकरी बांधवांना त्रास देणार्या तलाठी याचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवानी केलेली आहे

Post a Comment