गडचिरोली नगरपरिषद ची निवडणूक लढविणारे रिपब्लिकन पार्टीतील एकत्रपणे बैठक घेणारे पक्षातील काही मोठे पक्ष आता फुटीचे उंबरठ्यावर रिपाई प्रमुख पक्ष अनुपस्थितीत...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर



 गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुका आल्या म्हणजे आमचा पक्ष आंबेडकरी चळवळीतील आहे म्हणणू बैठक घेणे व आम्ही एकत्रित निवडणुका लढवितो अशा कांगावा करणे हा नेहमीचाच प्रयत्न नेहमीच फोल ठरत असुन या एकत्रिकरणातून बसपा व वचिंत हे दोन्ही प्रमुख पक्ष आता यातुन बाहेर पडणार असुन हे नेहमीचीच भानगड आहे उमेदवार देतांना रस्सीखेच होतो व हा विषयच संपणार आहे हा प्रत्येक न प च्या प्रत्येक निवडणुकीतील अनुभव आहे म्हणुन गडचिरोली जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेला गडचिरोली जिल्हयातील प्रमुख पक्ष बैठकीला हजर झाला नाही हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रिपाई विना एकीकरण शक्यच नाही
सदर एकीकरणात नामधारी उपस्थित असलेला परंतु भारतात तिसऱ्या नंबरवर असलेला बसपा पक्ष अश्या छोट्या पार्ट्यासोबत बसुच शकत नाही आता बसपा गडचिरोली नगर परिषदेत एकून १५ वार्डात आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करणार आहे. आणि अश्या छोट्या पार्ट्याच्या एकीकरणात बसपा प्रमुख सहमती देऊ शकत नाही. हे राजकारण न जाणणाऱ्याना सुद्धा माहीत आहे. महाराष्ट्रात नावारूपाला आलेला वंचित बहुजन आघाडी हि मागील विधानसभा - लोकसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या बल्यांढ बसपा पार्टीसोबत एकत्रीपणे निवडणुका लढविणे जमले नाही ती वंचित अश्या छोट्या पक्षाच्या एकीकरणात राहुच शकत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील वंचितचे प्रमुख नेते बाळू ढेंभुर्ण , जि.के बारसिंगे हे गोर गरीबांच्या समस्या सोडविणारे लढावू नेते जेव्हा बैठकीला गैरहजर होते यावरून काय ते समजावे. वंचित चे अध्यक्ष देव्हारे जरी उपस्थित होते परंतु गडचिरोली शहरात त्याचा गटाचा एकही कार्यकर्ता सापडणार नाही. यातून वंचितही बाहेर पडणार हे तेवढे मात्र खरे .
आझाद समाज पार्टी चे खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष आंबेडकरी चळवळीत खरा पक्ष ठरत आहे सदर पक्ष हा एकता चलो वाला असल्यामुळे मागे पुढे हा पक्ष महाराष्ट्रात वाढू शकतो सदर पक्षाचे प्रमुख विनोद मडावी व राज बन्सोंड सदर बैठकीला अनुपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीतील रिपाई बामसेफ ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआ महाराष्ट्र प्रदेश सदस्य ॲड. राम मेश्राम , शेडयुल कॉस्ट फेडरेशनचे प्रमुख ॲड. विनय बांबोळे व बामसेफ चे नेते भोजराज कान्हेकर नेहमीचीच भानगड म्हणून व कथाकथीत नेत्यासोबत बसायचे नाही म्हणुन बैठकीला पाठ फिरवली.
बसपा व वंचित यातून फुडीच्या उंबरण्यावर असल्यामुळे गोकुळनगर मधील कथाकथीत गोकुळनगरा अस्तीत्व नसलेला पक्षाचा नेता यापूर्वी दोन निवडणुकी कांग्रेसच्या खांद्याला खांदा लावून बसणारा नेता आता वंचित - बसपा बाहेर पडले मी एकटा काय करू अशा कांगावा करून कथाकथीत नेता कांग्रेसच्या दावणीला बसून ,न येणाऱ्या एखाद्या जागेवर तडजोड करून कांग्रेस सोबत राहणार असे भाकीत रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले असून हे खरे ठरणार हा येणारा काळच सांगेल याकडे जाणकारांचे लक्ष लागुन आहे.

0/Post a Comment/Comments