संशयाच्या वादातून पत्नीने केला पतीचा खून.. अन् माजली एकच खळबळ..


विदर्भ दखल न्यूज
पिंपरी चिंचवड ब्युरो


पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सामाजिक कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सामाजिक चळवळी पासून ते स्थानिक लेवल पर्यंतच्या सक्रिय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नुकुल भोईर या सामाजिक कार्यकर्त्याचा खून त्याच्याच पत्नीने केल्याचे कबुली स्वतः पत्नीने दिली आहे नुकुल भोईर हा आपल्या पत्नी आणि मुली समवेत पिंपरी चिंचवड शहरांमध्ये राहत होता आणि सामाजिक चळवळी मध्ये त्याची अग्रेसर भूमिका असायची मोर्चा आंदोलन यासारख्या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन तो काम करत असे मात्र त्याची पत्नी चैताली वर तो नेहमी संशय घेत होता आणि या संशय मधून पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते शुक्रवार दिवशी पती-पत्नी यांनी एकत्र बसून पार्टी सुद्धा केली होती. मात्र नकुलची संशयाची सवय कमी होत नव्हती पुन्हा नको ते पत्नीवर संशय घेऊ लागल्याने पत्नीच्या मनामध्ये मोठा राग निर्माण झाला आणि तिने पतीच्या गडा दाबून त्याचा खून केला चैतालीने पोलीस ठाण्यामध्ये फोन करून स्वतः फोन केल्याचे कबूल दिली पोलीस घटना स्थळावर गेले असता चैताली पतीच्या मृतदेह शेजारी बसलेली आढळली घटनेच्या
पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे

0/Post a Comment/Comments