सूर्यडोंगरी जंगल परिसरात जंगली हत्तीचा संचार, नागरिकांनी सतर्कता बाळगावी वन प्रशासनाचे आवाहन...

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली ब्युरो 


जेप्रा दिभना
जंगल परिसरामध्ये मागील 15 ते 20 दिवसापासून हत्तीचा संचार सुरू होता .मात्र तीन दिवसा अगोदर नवरगावच्या जंगलातून सूर्य डोंगरी देलोडा जंगल परिसरामध्ये हत्तीचा कळप सध्याच्या घडीला दाखल झाला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये सूर्य डोंगरी जंगल परिसरामध्ये हत्तीचा कळपाचा संचार आहे ..दोन दिवसा अगोदर हत्तीचा मार्गक्रमण वडद्या मुख्य मार्ग परिसरात झाल्याने मार्गावरील रहदारी खोळंबली होती
वन विभागाने परिसरातील प्रवासधारकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत .
जंगली हत्तीच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे . वन प्रशासन सुद्धा ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने जंगली हत्तीच्या कळपावर देखरेख ठेवून आहे.अशी माहिती
वन प्रशासनातील अधिकाऱ्याने दिली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन सुद्धा वन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments