विदर्भ दखल न्यूज
नाशिक ब्युरो
नाशिक
कर्तव्यावर निघालेल्या पोलिस अमलदाराचा रस्त्यात अपघात झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये नियुक्तीवर असलेले पोलीस अमलदार रणजीत मुरलीधर अपसुंदे हे परिवारासमित आडगाव परिसरामध्ये वास्तव्याने राहत होते. आणि त्यांनी तीन दिवसाची रजा सुद्धा घेतली होती तीन दिवसाच्या रजेमध्ये ते आपल्या मुळगाव जांबुटके येथे गेले होते .
तीन दिवसाची रजा संपल्यानंतर ते
आपल्या मूळ गावावरून कर्तव्यावर रुजू होण्याकरिता नाशिककडे जात असताना राशेगावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने पोलीस अंमलदार अपसुंदे यांचा जागीच मृत्यू झाला पोलीस अमलदार अपसुंदे यांचा अपघातादरम्यान मृत्यू झाल्याने गाव परिसरात मित्रमंडळीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात एक तेरा वर्षाचा मुलगा पत्नी आणि आठ वर्षाची मुलगी असा आप्त परिवार आहे. पोलीस ठाण्यामध्ये एक कर्तव्यदक्ष अंमलदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती .
घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Post a Comment