विदर्भ दखल न्यूज
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
घोट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती घोटच्या वतीने धम्मचक्र प्रर्वतन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्याअध्यक्षा सरपंच्या रुपालीताई दुधबावरे मुख्य मार्गदर्शक ॲड. प्रियंका चव्हाण चंद्रपूर RPI चे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर प्रमुख पाहुणे API किशोर शिंदे RPO वाडीघरे , डॉ. चंद्रशेखर डोंगरवार बामसेफ नेते भोजराज कान्हेकर RPI चे दशरथ साखरे तंटामुक्ती अध्यक्ष लाकडे ग्रा.प सदस्य वाकडे मॅडम होते . मुख्य मार्गदर्शक ॲड . रुपाली चव्हाण म्हणाले की बुद्ध धम्मात समानता आहे त्यामुळे बुद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होतो बुद्ध धम्म शांतीच्या मार्गाने चालणारा आहे त्यामुळे बौद्ध धम्म झपाट्याने वाढत चालला आहे. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला API शेंन्डे यांनी हार अर्पण केले तर झेंडावंदन घोट इलाखाचे अध्यक्ष विशाल दहिवले यांनी केले . याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर API शिंदे , सरपंच्या रुपाली दुधबावरे यांचेही समायोचित भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे संचलन हरिष वाळके यांनी प्रास्ताविक अध्यक्ष विशाल दहिवले तर आभार युवराज फुलझेले यांनी केले
कार्यक्रमास पो.पा जमनादास मेश्राम सचिव प्रदिप वाकडे खुशाल खोब्रागडे छत्रपती दुर्गे चक्रपाणी खोब्रागडे हिवराज डोहणे राजु पेरगुरवार खुशाल मेश्राम रवि गणविर प्रदिप झाडे आनंद नारनवरे रमाबाई वाकडे आदि सहीत घोट इलाख्यातील बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


Post a Comment