दुचाकी ओव्हरटेक करण्याच्या नादात एकाने गमावला जीव तर दुसरा गंभीर जखमी....


विदर्भ दखल न्यूज 
नागपूर ब्युरो 


नागपूर 
मरामजोब ते मुरदोली मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये दुचाकी स्लीप झाल्याने अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला घनश्याम भैयालाल मेंढे वय 50 वर्ष राहणार नागपूर असे अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील घनश्याम मेंढे व त्यांचा मुलगा गौरव घनश्याम मेंढे हे दोघे नागपूर वरून दुचाकी क्रमांक एम एच 35 एस एस 4923 या दुचाकी ने हलबी टोला साले कसा या गावाकडे येत होते मात्र वाटेत राष्ट्रीय महामार्गावर मूरदोली मार्गावर ट्रकला दुचाकी ओव्हरटेक करीत असताना दुचाकीचे नियंत्रण बिघडल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला गेली आणि अनियंत्रित झाली यामुळे घनश्याम मेंढे यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि ते जखमी झाले जखमी घनश्या मेंढे यांना ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेले असता त्यांचा मृत्यू झाला सदर मृत्यूचे आकस्मिक नोंद घेण्यात आली आहे पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे

0/Post a Comment/Comments