विदर्भ दखल न्यूज
आरमोरी ब्युरो
आरमोरी
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर वैरागड नजीक असलेल्या करपडा येथील रोशन गोविंदा पावले अंदाजे वय 26 वर्ष या युवकाचा 24 ..10 ..2025 शुक्रवारला सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोशन गोविंदा पावले हा युवक सकाळी झोपेतून उठल्यानंतर वडिलांना दवाखान्यात न्यायचे असल्याने
सकाळी झोपेतून लवकर उठला आणि आंघोळीला गेला आंघोळ करून घरात आल्यानंतर टी-शर्ट लावण्याकरिता वरती नायलॉन दोरीच्या आडोशाला ठेवलेली टी-शर्ट काढण्याकरिता लांबला असता टी-शर्ट खाली पडली ती उचलण्याकरिता खाली वाकला असता कुलरच्या बॉडीला रोशन पावले टच झाल्याने कुलरचा शॉक लागला
आणि खाली कोसळला अशी माहिती मिळाली आहे. लगेचच त्याला वैरागड येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये हलविण्यात आले .परंतु वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून त्याला मृत्यू घोषित केले. घटनेची माहिती आरमोरी पोलीस ठाणे यांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृताचा पंचनामा करून मृतकाचे शव जिल्हा उप रुग्णालय आरमोरी येथे शव विच्छेदनाकरिता पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे
घरातील जवान युवक एकाकी गेल्याने आई-वडिलावरती परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहेत गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment