विदर्भ दखल न्यूज
यवतमाळ ब्युरो
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील महागाव येथील शेतकरी संजय गंगेवाड वय 54 वर्ष हे घरातून सकाळी बाहेर पडल्यानंतर घरी परतलेच नसल्याने घरच्यांनी इतरत्र त्यांचा शोध घेतला असता गावाशेजारी असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या
स्थितीमध्ये आढळून आले घटनेची माहिती लगेच मृतक शेतकऱ्याचे भावाने बीटगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतकाचे शव शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे. यवतमाळ जिल्हा अंतर्गत बाबुळगाव तालुक्यातील हस्तापूर
(शुभेच्छुक..मिलिंदजी नरोटे आमदार गडचिरोली)
येथील शेतकरी हरिदास शिवरकर वय 60 वर्ष या शेतकऱ्याने. कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक शेतकऱ्याची पत्नी शेतावर
जेवणाचा डबा घेऊन गेली असता हरिदास शिवरकर हे खाली पडून आढळले आणि त्यांच्या जवळच कीटकनाशकाचा डब्बा सुद्धा आढळला घटनेची
माहिती गावातील घरच्यांना देण्यात आली .लगेच घरच्यांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपास अंती मृत्यू घोषित केले घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे यवतमाळ जिल्हा दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.





Post a Comment