तरुण शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या ...



विदर्भ दखल न्यूज 
हिंगोली ब्युरो 



हिंगोली 
हिंगोली जिल्हा अंतर्गत येत असलेल्या वसमत तालुक्यातील अकोली गावातील तरुण अल्पभूधारक शेतकऱ्यांने नापिकी व कर्जाच्या कारणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची वसमत पोलीस ठाण्यामध्ये बुधवार रोजी 29 तारखेला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे .पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली तालुका अंतर्गत वसमत तालुक्यातील अकोली या गावातील माणिक दत्तराव कदम व 35 वर्ष यांचे गाव परिसरामध्ये शेत आहे आणि त्या शेतीवर त्यांनी शाखा खांडेगाव या बँकेकडून एक लाख रुपयाचे शेतीच्या कामाकरिता कर्ज घेतले असल्याची माहिती मिळाली आहे .मात्र शेतकरी माणिक दत्तराव कदम यांच्या मनामध्ये यावर्षी दुष्काळ अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील सोयाबीनचे पीक व इतर पीक उध्वस्त झाले यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला या अस्वस्थतेमध्ये काही दिवसापासून होते.
घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.

0/Post a Comment/Comments