कवी दीपक चव्हाण पुणे येथील राज्यस्तरीय साहित्य समारंभात सन्मानित...


विदर्भ दखल न्यूज 
पुणे ब्युरो 


पुणे 
पुणे – महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे नुकत्याच दि. 5रोजी झालेल्या 17 व्या छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाला राज्यभरातील कवी व साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मान्यवरांची उपस्थिती;

या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक संतोष नारायणकर, निमंत्रक म्हणून किशोर टिळेकर, सुर्यकांत नामगुडे, स्वागताध्यक्ष विजया गायकवाड, तर उद्घाटक म्हणून डॉ. शरद गोरे उपस्थित होते.


---

दीपक चव्हाण यांची प्रभावी कविता

कविसंमेलनात दीपक चव्हाण (प्राथमिक शिक्षक, इंडियन एज्युकेशन सोसायटी नवी मुंबई प्रायमरी स्कूल – रहिवासी अंबरनाथ, जिल्हा ठाणे) यांनी “आजच्या काळात शंभुराजे असते तर” ही प्रभावी कविता सादर केली.
कवितेत त्यांनी भ्रष्टाचार, अन्याय, शेतकऱ्यांची व्यथा व समाजासमोरील बिकट वास्तव यावर तीक्ष्ण भाष्य केले.
---
कवितेतील ठळक ओळी

“शंभुराजे असते तर ते सत्तेच्या सोन्याच्या खुर्च्या जाळून टाकले असते!”
“जनतेच्या रक्तावर उभे राहिलेले महाल, एका क्षणात धुळीत मिळवले असते!!”

या ओळींनी उपस्थित प्रेक्षकांना भारावून टाकले.
---
सन्मानचिन्ह देऊन गौरव

दीपक चव्हाण यांच्या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांना टाळ्यांचा कडकडाट करायला भाग पाडले.
त्यांच्या उत्कृष्ट कवितासादरीकरणाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 
त्यांच्या या कार्याबद्दल मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे गाव परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0/Post a Comment/Comments