गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली
ब्युरो
चामोर्शी तालुक्यापासून जवळच असलेल्या
तळोधी मोकासा येथे बीएसएनएलचे टॉवर उभारले आहे. आणि यामुळे परिसरात बऱ्यापैकी बीएसएनएलचे वापरकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत मात्र गेल्या एक वर्षांपासून बी एस एन एल टॉवरची लाईट गेल्यास (बी एस एन एल )नेटवर्क ची समस्या भेडसवत होती परिपूर्ण नेटवर्क मिळत नव्हते.यामुळे तळोधी मो. जवळील ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात मनस्थाप सहन करावा लागत होता व लोकांचे अति तातडीचे कामे वेळेवर होत नव्हती लोकांना फार अडचण निर्माण होत होती . याकरिता बीएसएनएल वापरकर्त्यांनी. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे इंजि अंकुश संतोषवार मनविसे जिल्हा
उपाध्यक्ष गड, यांना बीएसएनएल नेटवर्क समस्या बद्दल माहिती दिली. लगेच संतोषवार यांनी चामोर्शी व गडचिरोली येथील बी एस एन एल कार्यालय येथे संबंधित विषयाचा पाठपुरावा केला व बॅटरी उपलब्ध न झाल्यास खडखट्ट्याक आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला . बीएसएनएल कार्यालकडून पाठपुराव्याची
दखल घेऊन ताबडतोब बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली. आणि नेटवर्क समस्या सुरळीत करण्यात आली आहे. या सार्वजनिक सामाजिक हितार्थ कार्याबद्दल अंकुश संतोषवार व मनविसे चे (बी एस एन एल) सिम वापरकर्त्यांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे समाधान व्यक्त होत आहे.



Post a Comment