युवतीने गळफास घेऊन केली आत्महत्या....

गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
कुरखेडा ब्युरो


कुरखेडा : इयत्ता 11 व्या वर्गात शिकत असलेल्या
युवतीने वास्तव्य नसलेल्या जुन्या घरामध्ये घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना कुरखेडा तालुक्यातील वडेगाव येथे शुक्रवार, ला १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली . गळफास घेतलेली चैताली प्रल्हाद बोरकर (१७) असे मृत युवतीचे नाव आहे. चैताली ही युवती कुरखेडा येथील विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत होती. शुक्रवार दिवशी घरी कुणीच नसल्याचे पाहून तिने घराला लागूनच असलेल्या जुन्या घराच्या आळ्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घरातील कुटुंबियांनि चैतालीचा शोध घेतला असता कुठेही दिसून आली नाही मात्र पडीक वास्तव नसलेले जुन्या घरात बघितले असता ती घराच्या आळ्याला गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळली.लागलीच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली .
पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.
युवतीने गडपास घेऊन आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही .


0/Post a Comment/Comments