गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
देसाईगंज ब्युरो
*दिनांक: १० सप्टेंबर २०२५*
देसाईगंज-- सांस्कृतिक भवन, नगरपरिषद देसाईगंज येथे ग्रामविकास व पंचायतराज विभाग पंचायत समिती देसाईगंज, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने "मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान" अंतर्गत "तालुका स्तरीय कार्यशाळेचे" आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे सहउद्घाटन म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते. कार्यक्रमास आमदार रामदास मसराम, माजी उपसभापती गोपाल उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पेंदाम, तहसीलदार डुडूलकर मॅडम, नितीन राऊत, सरपंच अपर्णा राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद ठीकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी मा. आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतींना अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, यामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगितले. त्यांनी ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात पंचायत राजच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात पंचायतराज व्यवस्थेचे महत्व, ग्रामीण विकासासाठी घेतल्या जाणार्या उपाययोजना, शासनाच्या विविध योजना आणि जनसहभागाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेने ग्रामस्थांना माहिती व प्रेरणा मिळाली असून पुढील काळात कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल.

Post a Comment