गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
आरमोरी तालुक्यातील मौजा कोजबी येथे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत तालुका कृषी विभाग आरमोरी यांच्या वतीने महिलांची शेतीशाळा पार पडली..या शेतीशाळेत महिलांना कृषी विभागाच्या वतीने धान्य व इतर पिकांवरती येणारे शत्रू कीड व मित्र कीड यांच्या विषयी तालुका कृषी विभाग आरमोरी येथील . कु .जे. आर. आत्राम सहा.कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
सदर शेतीशाळाही कोजबी ग्रामपंचायतींच्या सरपंच मा. कविता. ताडाम यांचे अध्यक्षते खाली घेण्यात आली. शेती शाळा तालुका कृषी विभाग आरमोरी येथील मा.श्री नाकाडे मंडळ कृषी अधिकारी श्री शेंडे उप कृषी अधिकारी मा.श्री.नीलेश गेडाम तालुका कृषी अधिकारी आरमोरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कृषी विभाग यांच्यावतीने कोजाबी येथे घेण्यात आलेल्या शेती शाळेला बहुसंख्य महिलांची व शेतकऱ्यांची उपस्थिती होती

Post a Comment