गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
कुरखेडा - आरपिआय चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे यांच्या प्रमुख उपस्थितित तालुका कुरखेडा तालुका आरमोरी चा दौरा व बैठका पार पडल्या .
बौध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम गडचिरोली येथे दि. १९ सष्टेंबर २०२५ रोजी आयोजीत करण्यात आला असुन सदर कार्यक्रमात भन्ते विनाचार्य भन्ते आकाश लामा भन्ते ज्ञानज्योती यांचे मार्गदर्शन लाभणार असुन सुप्रशिद्ध गायक विकास राजा यांच्या भिम गिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या दृष्टीकोणातून आरपिआय च्या टिमने कुरखेडा तालुक्यातील मंगेश बन्सोड कसारीडॉ. ढेंभुर्णे मंगला बोरकर गेवर्धा नानाजी वालदे तळेगांव लता भैसारे मोरेश्वर राऊत विलासिनी राऊत कुंभीटोला ससैदलाचे मुत्ताजी दुर्गे ' विजय जांभुळकर तर प्रमोद भैसारे संतोष खोबागडे डोमाजी नंदेश्वर ताराचंद नंदेश्वर अनिल बांबोळे कुरखेडा रविद्र सहारे जयश्री लाळे चेतना लाळे बेलगांव तर आरमोरी तालुक्यातील रिपाईचे युवा नेते दिनेश बनकर कोजबी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सोनु साखरे ,हर्ष साखरे शिवणी सुरेश बोरकर वैरागड टिकाराम ढेंभुर्ण बाळु ढेंभुर्ण मोहटोला मोरेश्वर उंदिरवाडे मौशीखांब नाजुक भैसारे आंबेशिवणी आदि गावातील आरपिआय चे प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कार्यक्रमास बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले.

Post a Comment