दिघोरी येथील सौर पंपाचे गाव गुंडाकडून तोडफोड, कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा .
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


साकोली - साकोली तालुक्यातील मौजा दिघोरी मोठी येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये सन 2022 -23 मध्ये चार लाख 45 हजार रुपये खर्च करून तेथील नागरिकांना दुहेरी सौर पंप योजनेअंतर्गत पाण्याची सुविधा करण्यात आलेली होती‌‌. परंतु काल दिनांक9/9/2025 रोजी वार्डातीलच गावगुंडांनी त्याची नास धूस व तोडफोड केलेली आहे .याकडे ग्रामपंचायत किती जातीने लक्ष देऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसान झालेल्या ची भरपाई करून घेणार का ?याची नागरिकात चर्चा होऊ लागली आहे. तरी ग्रामपंचायतीने गाफील न राहता तात्काळ संबंधितावर गुन्हे दाखल करावे पण नुकसान झालेल्या सामानाची भरपाई त्यांच्याकडून तात्काळ करून घेण्यात यावी .व संबंधित योजना पूर्ववत ग्रामपंचायत सुरू करण्यात यावे अशी दिघोरी नागरिकाकडून मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments