तहसीलदार सह महसूल कर्मचारी थोडक्यात बचावले. कारला धडक दिल्याने झाला अपघात...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
चंद्रपूर ब्युरो 
मूल : ब्रह्मपुरीवरून चंद्रपूरला प्रशिक्षण घेण्यासाठी जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. या धडकेत कार उलटल्याने दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले. ही घटना मूल-चंद्रपूर मार्गावरील डोनी फाट्याजवळ गुरुवारी (दि.२१) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. सर्वांना मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुटी देण्यात आली.

नायब तहसीलदार विनोद बोडे, नायब तहसीलदार महानंदा मडावी (५०, रा. ब्रह्मपुरी), सहायक महसूल अधिकारी सरिता बालकृष्ण चन्ने (४६, रा. ब्रह्मपुरी), चालक सूरज रामकृष्ण नेहाटे (३१, रा. मालडोंगरी), लिपिक प्रिया शेंडे (४५, रा. ब्रह्मपुरी), लिपिक दुर्गा गायकवाड (४५, रा. सिंदेवाही), आशा दिलीप कोहळे (४२) अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ब्रह्मपुरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांनी एम.एच.जी. ३४ सी. डी. ७५६२ क्रमांकाच्या कारने कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चंद्रपूर येथे प्रशिक्षणाला जात होते.
ट्रक चालक फरार
चंद्रपूरकडून येणाऱ्या एम. एच. ३४ बी. झेड. ६७९२ क्रमांकाच्या ट्रकने बोलेरो कार समोरासमोर जोरदार धडक दिली. त्यामुळे कार उलटली. या घटनेत दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले. सर्वांनी कारमधून स्वतःची कशीबशी सुटका केली.
मोठी दुर्घटना टळली
वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावरून जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक पुलाच्या कठड्यात अडकला. ट्रक खाली कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना दुपारी १ वाजता घडली

0/Post a Comment/Comments