आरमोरी येथे 25 जुलैला आमदार रामदास मसराम यांचा जनता दरबार...


गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी- तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित अडीअडचणी, समस्या व प्रश्नांची सोडवणूक एकाच ठिकाणी, वेळेत व प्रभावी पद्धतीने व्हावी या उद्देशाने तहसील कार्यालयातील सभागृहात जनता दरबार आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ जुलैला ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कृषी विभाग, महावितरण, महसूल विभाग (तलाठी, मंडळ अधिकारी, सर्व सरपंच ग्रामपंचायत व पंचायत समिती (ग्रामसेवक) पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पोलीस विभाग, वन विभाग, भूमी अभिलेख विभाग (आखीव पत्रिका संबंधित) इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांच्या समस्या तात्काळ नोंदवून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,
असे आवाहन आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments